#

Advertisement

Saturday, September 28, 2024, September 28, 2024 WIB
Last Updated 2024-09-28T12:03:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तुतारी आणि पिपाणी चिन्हाबाबत बोलणार नाही !

Advertisement

मुंबई : विधानसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी असा गोंधळ होऊ नये याबाबत कोणता निर्णय घेणार?  याबाबत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी भाष्य केलं आहे. चिन्हबाबत ऑर्डर आम्ही दिली आहे. त्याला देखील कोर्टात चॅलेंज करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मी यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया राजीव कुमार यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोग गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर आयोगाने महाराष्ट्रात राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन दिवस महाराष्ट्रातील प्रशासनाचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केल आहे.
राजीव कुमार म्हणाले, दिवाळी आणि छट पूजा लोकांचे सण विचारात घेऊन  निवडणुकीच्या तारखा जाहीर कराव्यात अशी या पक्षांनी विनंती राजकीय पक्षांनी केली आहे.