#

Advertisement

Thursday, September 19, 2024, September 19, 2024 WIB
Last Updated 2024-09-19T10:55:27Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माढ्यात आमदार बबनदादांना घेरण्यासाठी विरोधकांचे डावपेच

Advertisement

इच्छूक उमेदवारांनी महादेव मंदिरात घेतली शपथ 

माढा : विधानसभा मतदारसंघात देखील निवडणूक लढवण्यास अनेकजण इच्छुक आहेत. बरेच जण शरद पवार यांच्या पक्षाकडून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यासाठी अनेकांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली आहे. 
दरम्यान, अशातच आता माढा विधानसभेत आपल्या भांडणाचा लाभ आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटाला मिळू नये, म्हणून माढ्यातील जवळपास आठ इच्छुक उमेदवारांनी एकत्र येत टेंभुर्णी येथील अति महारुद्र महादेव मंदिरात शपथ घेतली आहे. या सर्वांनी ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. माढ्यातील जवळपास आठ इच्छुक उमेदवारांनी एकत्र येत टेंभुर्णी येथील अति महारुद्र महादेव मंदिरात शपथ घेतली आहे. माढ्यातून संजय बाबा कोकाटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे, काँग्रेसचे दादासाहेब साठे, शरद पवार गटाचे संजय पाटील घाटणेकर ,भारत पाटील , नितीन कापसे आणि हरिदास रणदिवे हे सर्व इच्छुक एकत्र आले आहेत. महादेवाच्या साक्षीने यांच्या चर्चा होऊन यातील ज्या कोणाला तिकीट मिळेल त्याच्यामागे इतरांनी एकत्र राहायचे अशी शपथ महादेवाला साक्षी ठेवून घेण्यात आली. 
दरम्यान, माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास 55 हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळं आता माढा विधानसभेसाठी माढ्यातून इच्छुकांची गर्दी वाढली आहे. हे सर्व इच्छुक पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटून आपणच कसे योग्य उमेदावार आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र,  आमदार बबनदादा शिंदेची वाट सुकर होताना दिसत होती. त्यामुळेच आमदार शिंदे यांनी यावेळी आपला मुलगा रणजीत भैय्या शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे.