#

Advertisement

Thursday, September 19, 2024, September 19, 2024 WIB
Last Updated 2024-09-19T10:41:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विद्यमान आमदार अश्विनी जगताप तुतारी फुंकणार?

Advertisement

चिंचवड : विधानसभेत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या तुतारी फुंकण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जातं आहे. दीड महिन्यांपूर्वी अश्विनी जगताप यांनी शरद पवारांसोबत याबाबत संवाद साधल्याची ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अश्विनी जगताप हे वेळोवेळी नाकारत आल्यात, याबाबत त्या कॅमेऱ्यासमोर ही प्रतिक्रिया देणं टाळतात. मात्र, भाजपकडून त्यांचे दिर आणि शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु आहेत. यामुळं जगताप तुतारी फुंकू शकतात, अशी चर्चा आहे.
दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या जागी झालेल्या पोट निवडणुकीत अश्विनी जगताप आमदार झाल्या, मात्र तेंव्हा त्यांचे दिर शंकर जगताप ही देखील इच्छुक होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी शंकर जगताप यांना थांबण्याची आणि पुढं तुम्हाला संधी देऊ. असा शब्द दिला होता, असं नेहमी बोललं जातं. ती संधी या विधानसभेत शंकर जगताप यांना मिळणार, आहे. हे अश्विनी जगताप यांना लक्षात आल्यानं त्या त्यांची पुढची राजकीय वाटचाल तुतारी हातात घेऊन, करू शकतात अशी चर्चा आहे. शरद पवार त्यांना राष्ट्रवादीच्या कुटुंबात प्रवेश देण्याबाबत विचार करू शकतात आणि कदाचित दिर-भावजय अशी लढत चिंचवडमध्ये पहायला मिळू शकते. मात्र, एकाच घरातमध्ये दोघांना तिकीट मिळणं अशक्य आहे. त्यामुळे अश्विनी जगताप या वेगळा मार्ग निवडण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जाते.