#

Advertisement

Thursday, September 5, 2024, September 05, 2024 WIB
Last Updated 2024-09-05T11:52:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

...तर तुम्हाला शेतकरी पाडल्या शिवाय सोडत नाही !

Advertisement

आंतरवाली सराटी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना आरक्षणावर चर्चा झाली नाही. शेतकरी चारी बाजूने संकटात सापडला, त्यांचे हाल होत आहेत. हा विषय महत्त्वाचा वाटला म्हणून त्या मुद्द्यावर चर्चा झाल. आठ दिवसात मदत द्या असं मी त्यांना बोललो. तुम्ही मदत देत असताना म्हणत असाल, आठ दिवसांनी देतो, दहा दिवसांनी देतो आणि देताना दोन वर्षांनी देतात. तर तुम्हाला शेतकरी पाडल्या शिवाय सोडत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फोनवरून जरांगे आणि फडणवीसांचं बोलणं करून दिलं. याबाबत जरांगे यांनी याबाबत स्पष्ट केले.  विधानसभेचा संबंध तुमचा फायनल विषय झाल्यावर होईल. लढायचे की पाडायचे ज्या दिवशी ठरेल त्या दिवशी राजकारणाचा विषय होईल, असं जरांगेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कोण किती लबाड बोलते हे कॅबिनेट बैठक झाल्यावर कळेलच. शेतकऱ्यांचा कानावर सरसगट शब्द गेलेला आहे आणि शेतकऱ्यांची कोणीही फसवणूक करू शकत नाही. त्यांनी शेतकऱ्यांना फसवले, हे समजायचं की शेतकरी त्यांना फसवणार आहेत. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मिळणारा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला असेल तर ही वाईट घटना आहे. मग सरकार खूप वाईट चाल खेळत आहे, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.