Advertisement
सांगली : तुम्ही भाजपवाल्यांना घाबरवून सोडलय. इथे येऊन मला आनंद होतोय. पंतगराव कदम यांच्या प्रेमाखातर आलो. विकास, शिक्षणाच काम त्यांनी केलं. काँग्रेस पक्षासोबत पूर्ण मनापासून आयुष्यभर उभे राहिले. इंदिरा गांधी निवडणुक हरल्यानंतरही पंतगराव कदम त्यांच्यासोबत होते. महाराष्ट्र प्रगतीशील राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर या युगपुरुषांनी फक्त महाराष्ट्रालाच नाही संपूर्ण देशाला प्रेरणा दिली” असं राहुल गांधी म्हणाले.
सांगली येथे पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावर प्रसंगी ते बोलत होते. “मी खर्गेजीना आज बोललो. काँग्रेस अध्यक्ष आहेत. आम्ही लँड केलं. मी एक गोष्टी नोटीस केली आहे. मी तुमच्यासोबत कर्नाटकाला येतो, तेव्हा तुम्ही खुश होता. तुम्ही महाराष्ट्रात येता, तेव्हा सुद्धा आनंदी असता, एकासेकंदात त्यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रात काँग्रेसची विचारधारा रुजलेली आहे. त्यामुळे मी इथे येतो, तेव्हा आनंदी असतो. माझी सुद्धा तीच भावना आहे” असं राहुल गांधी म्हणाले.
