#

Advertisement

Thursday, September 5, 2024, September 05, 2024 WIB
Last Updated 2024-09-05T12:11:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

चिंचवडमधला कौटुंबिक वाद मिटला

Advertisement

चिंचवड : विधानसभा मतदारसंघ जगताप कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. चिंचवडमधून सर्वप्रथम लक्ष्मण जगताप यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर 2019 पर्यंत लक्ष्मण जगताप यांनाच मतदारांनी निवडून दिलं. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी चिंचवडमधून पोटनिवडणूक जिंकली. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधु शंकर जगताप हे चिंचवडमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. दिवंगत लक्ष्मण जगताप यांची राजकीय उत्तराधिकारी मीच आहे, असं अश्विनी जगताप म्हणाल्या होत्या. भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि दीर शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात चिंचवड विधानसभेवरून समझोता झाल्याची माहिती आहे. एका महत्त्वाच्या मतदारसंघावरुन सुरु असलेला कौटुंबिक वाद मिटला आहे. अश्विनी जगताप यांनी नुकतंच लक्ष्मण जगताप यांचा राजकीय वारसदार मीच असल्याचे विधान करत चिंचवड विधानसभा लढण्यावर ठाम असल्याच म्हटलं होतं. दुसरीकडे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा लढवण्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या वादावर पडदा पडल्यामुळे अश्विनी जगताप समर्थकांची गोची झाली आहे. जगताप कुटुंबातच चिंचवडच्या उमेदवारीवरुन वाद होता. आता हा वाद संपल्याची माहिती मिळत आहे.