#

Advertisement

Friday, September 6, 2024, September 06, 2024 WIB
Last Updated 2024-09-06T12:12:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात बहुरंगी लढत ? बंडखोरीची शक्यता

Advertisement

सोलापूर : जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात महत्वाचा आणि लक्षवेधी मतदारसंघ असलेल्या पंढरपूर-मंगळवेढामध्ये यंदा बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पंढरपुरात आपल्याच पक्षाचा आमदार असावा, यासाठी राजकीय पक्ष मोठी ताकद लावतात. त्यामुळे, येथील निवडणुकीत यंदा चांगलीच चूरस पाहायला मिळेल. पंढरपुरात सध्या भाजपचे समाधान अवताडे हे विद्यमान आमदार असून त्यांना महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात  दोन तालुके येतात. मात्र, साखर कारखानदारांचा हा तालुका आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकरी आणि कारखानदारी हा फॅक्टर येथे महत्वाचा ठरतो. दूध संघ, कारखानदारी, बाजार समिती अशा सहकार खात्याशी संबंधित वजनदार उमेदवार येथे सरस ठरू शकतो. त्यामुळे, ऊस उत्पादक शेतकरी, पंढरी नगरीचा विकास आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक या मतदारसंघात महत्वाची ठरते.
जागावाटपात पंढरपूर विधानसभेची जागा कोणाला सुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महायुतीचा विचार केल्यास येथे विद्यमान आमदार भाजपचे असल्यामुळे येथील जागा भाजपलाच मिळणार आहे. गत 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने येथे चुरशीची लढत दिली होती. त्यामुळे, महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच सुटणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या दोन पक्षात पंढरपूरसाठी लढत होईल.
मात्र, महायुतीकडून विद्यमान समाधान अवताडे यांना तिकीट देण्यास आल्यास प्रशांत परिचारक हे तुतारी हाती घेऊ शकतात. तर, महाविकास आघाडीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके पुन्हा एकदा राष्ट्रवादीत म्हणजे शरद पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढवू शकतात. तर, साखर कारखानदार अभिजित पाटील यांचेही नाव महाविकास आघाडीकडून चर्चेत आहे.