#

Advertisement

Monday, September 9, 2024, September 09, 2024 WIB
Last Updated 2024-09-09T13:04:44Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुलगी बापाविरोधात लढणार?

Advertisement

गडचिरोली : महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी बापाला आव्हान देणार आहे. गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात वडील विरुद्ध लेक असा संघर्ष पहायला मिळू शकतो. ही लढत अजित पवार गटासाठी मोठ चॅलेंज असणार आहे. कारण, अजित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी  थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. 
धर्मारावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगीकर शरद पवार पक्षात प्रवेश करणारेत...12 सप्टेंबरला गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार पक्षाची शिव स्वराज यात्रा होत आहे...त्या यात्रेच्याच कार्यक्रमात भाग्यश्री आत्राम शरद पवार पक्षात प्रवेश करणारे...काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांनी भाग्यश्री आत्राम शरद पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली होती...त्याचबरोबर भाग्यश्री आत्रामने शरद पवारांचीही भेट घेतल्याची चर्चा होती...अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त ठरला आहे.
दरम्यान, भाग्यश्री आत्राम यांच्या शरद पवार पक्षात प्रवेशाची घोषणा होताच, त्या सरकारविरोधात आक्रमक झाल्या आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावाने भरपूर निधी देता आणि दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायचं नाही...फक्त निवडणूक जिंकण्यापुरतीच लाडकी बहीण योजना आहे का? अशा शब्दांत भाग्यश्री आत्राम यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.