#

Advertisement

Tuesday, September 10, 2024, September 10, 2024 WIB
Last Updated 2024-09-10T12:09:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूर ‘शहर मध्य’साठी एमआयएम तर्फे फारूक शाब्दि यांच्या उमेदवारीची घोषणा

Advertisement

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाकडून महाराष्ट्र राज्यात पाच उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या नावाची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अससुद्दिन ओवेसी यांनी केली आहे.
फारूक शाब्दी यांनी शहर मध्य या मतदारसंघातून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते 38 हजार मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. नवखे असतानाही त्यांनी चांगली फाईट दिली होती. आता मागील पाच वर्षात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली जोरदार मोर्चेबांधणी  सुरू केली आहे. आता शहर मध्य च्या हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने शाब्दि यांना या मतदारसंघातून आमदार होण्याची मोठी संधी आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शाब्दी यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात एम आय एम चा उमेदवार न दिल्याने मुस्लिम समाजातून त्या निर्णयाचे कौतुक झाले होते आणि याचा फायदा काँग्रेसलाही झाला. त्यामुळे मुस्लिम समाजाचा यावेळी आमदार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.