#

Advertisement

Monday, September 23, 2024, September 23, 2024 WIB
Last Updated 2024-09-23T12:41:00Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

दादा आपसे बैर नही, राजन तेरी खैर नही !

Advertisement

सोलापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीत दुफळी 

सोलापुर : मोहोळ तालुक्यातील कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राजन पाटील आणि प्रवक्ते उमेश पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. दोघांमध्ये सातत्याने एकमेकांविरोधात कुरघोड्याही करण्यात येतात. आता उमेश पाटलांनी 'दादा आपसे बैर नही, राजन तेरी खैर नही', अशी घोषणाच केली आहे. 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोहोळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पडला. मात्र मोहोळ अपर तहसील कार्यालयच्या मुद्यावरून मोहोळ बचाव संघर्ष समितीकडून उद्या मोहोळ बंदची हाक देण्यात आली होती. विशेष म्हणजे अजित पवारांचे विश्वासू समजल्या जाणारे, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांचा देखील बंदला पाठिंबा होता. दादा आपसे बैर नही, राजन तेरी खैर नही,असा नारा देत उमेश पाटलांनी बंदला पाठिंबा दिला. बंद हा राजकीय भूमिकेतून नसून लोकांच्या मागणीसाठी असल्याचे मत उमेश पाटील यांनी मांडले. काही दिवसापूर्वी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर गावात नव्याने अपर तहसील कार्यालय सुरु झालं आहे. मोहोळ येथील विविध पक्षातील राजकीय नेत्यांचा अनगर येथे हे कार्यलय होण्यास विरोध असून या आधी अनेक आंदोलन झाले होते. मात्र आंदोलननंतर ही अनगर येथे हे अपर तहसील कार्यालय सुरु झाले आहे,