#

Advertisement

Monday, September 23, 2024, September 23, 2024 WIB
Last Updated 2024-09-23T12:24:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भोसरीत तुतारीचा प्रचार करणार नाही ?

Advertisement

पुणे : भोसरी विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाच्या मशालीला सुटली नाही तर आम्ही तुतारीचा प्रचार करणार नाही. असा एकमुखी ठराव तर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला असल्याची माहिती आहे. यावर आम्ही पदाचे राजीनामे देऊ, असा इशारा ही देण्यात आल्याची माहिती विश्वासू सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात भोसरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यात जमा आहे. याची कुणकुण लागल्यानं ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक पवित्र्यात आहेत. भोसरीतील शिवसैनिकांनी गुप्त बैठक घेत तुतारीचा प्रचार न करण्याचा ठराव केला, तसेच आम्ही राजीनामे ही देऊ. आत्ताच आपण मीडियात याबाबत बोलायला नको पण हा निरोप मातोश्रीवर जायला हवा, अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतल्याचं बोललं जातं आहे.  भोसरी आणि पिंपरीत मशाल चिन्हचं हवं, असा आग्रह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे.  

पिंपरीत अजितदादा गटाचा प्रचार न करण्याचा ठराव?
पिंपरी मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी दावा सांगायला सुरूवात केली आहे तर या ठिकाणी विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षाचा आहे, तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांना विरोध दर्शवला आहे. पिंपरी विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करायचा नाही. असा ठराव करत भाजपने थेट आमदार अण्णा बनसोडेंना विरोध दर्शवला आहे.