Advertisement
आमदार अमोल मिटकरी यांची टिका
मुंबई : बारामतीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा फोटो काळ्या कपड्याने झाकल्याने महायुतीत पुन्हा एकदा खटका उडाला आहे. या घटनेवर आमदार अमोल मिटकरी यांनी टिका केली आहे.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना वेळ भेटला नसेलय. काळा कपडा टाकून ठेवला म्हणजे बारामतीचा विकास झाकला असं नाहीय. दरम्यान, काळा कपडा टाकून सूर्याला झाकण्यासारखं हा प्रकार असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलंय. तसेच, काळे झेंडे दाखवणारे आणि आजचा हा प्रकार करणारे हौसे कार्यकर्ते, त्यांच्या वागण्याने त्यांच्याच पक्षाची प्रतिमा मलिन होते. आजच्या प्रकारामुळे शिंदे गट बदनाम झालाय, तिन्ही पक्षात एकवाक्यता असल्याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीत यश प्राप्त होऊ शकणार नाही. त्यामुळं वरिष्ठांनी अशांना सक्त तंबी दिली पाहिजे, असेही मिटकरी यांनी म्हटले. आमच्याही भावना आहेत, भावनांचा उद्रेक झाल्यास मोठा विध्वंस होणार, असा इशाराही मिटकरी यांनी शिवसेनेला दिला आहे.
