Advertisement
उमेश पाटलांनी ठेवला राजीनामा लिहून
मोहोळ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचा अध्यक्षपद करत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जाही देण्यात आलाय. दरम्यान, यामुळे राजन पाटलांचे विरोधक आणि अजित पवारांचे समर्थक उमेश पाटील नाराज झाले आहेत. त्यांनी आता थेट मी राजीनामा लिहून ठेवला असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवारांची साथ सोडल्यानंतर सोबत राहिलेले उमेश पाटील आता अजितदादांची साथ सोडतात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोहोळ तालुक्यातील दोन पाटलांचा वाद चिघळला आहे. माजी आमदार राजन पाटलांना राज्य सहकार परिषदेचा अध्यक्ष पद दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. लग्नापूर्वी पोरांनी लफडे केल्याचा आणि 302 कलम भोगण्याचा अभिमान असणाऱ्या माणसांवर पक्ष विश्वास ठेवत याचं वाईट वाटतं. ज्यांनी आयुष्यभर सहकार संस्था बुडवल्या त्यांनाच आता सहकार परिषदेचे अध्यक्ष पद बहाल केले गेलाय, अशी खंत उमेश पाटलांनी व्यक्त केली आहे. अजितदादांवर नेमकी काय जादू केलीय याची मलाही माहिती नाही,पण अजित दादांनी मला बैलगाडी खालचा कुत्रा म्हणून संबोधलं याचं वाईट वाटलं नाही. मात्र जरं पक्षाला माझा त्रास होतं असेल तर मी माझा राजीनामा तयार ठेवला आहे.
