Advertisement
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेसाठी 'मिशन विदर्भ'साठी रणनीती आखत आहेत. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. 27 तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्हाचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. तर 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेतला जाईल. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी 7 उमेदवार जाहीर केले आहेत. आता मनसे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे. 27 तारखेला राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील नेत्यांची यादी जाहीर करतील असे बोलले जात आहे.
राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे 7 उमेदवार|
1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे - पंढरपूर
3. लातुर ग्रामीण - संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे
5. चंद्रपूर - मनदीप रोडे
6. राजुरा - सचिन भोयर
7. वणी - राजू उंबरकर
