Advertisement
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले शिक्कामोर्तब
अकोले : राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने राज्यभरात शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. आज ही यात्रा अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले येथे पोहचली. या यात्रेच्या जाहीर सभेतून बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मविआच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब कधी होणार? याबाबत थेट तारीखच सांगितली.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर जयंत पाटील म्हणाले की, एक तारखेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. आम्हाला आघाडी टिकवायची आहे. त्यामुळे आज उमेदवाराची घोषणा करणार नाही. सध्या पितृपक्ष सुरू आहे. घट बसल्यावर मुहूर्त आहे. त्यामुळे उमेदवाराची घोषणा तेव्हाच होईल.
जयंत पाटील म्हणाले की, 31 खासदार दिल्लीला आपण पाठवले. भाजपाला लक्षात आलंय आता त्यांचं सरकार येणार नाही. त्यामुळे तिजोरीचे दार उघडून पाहिजेत अशा घोषणा केल्या जात आहेत. त्यांची लाडकी खुर्ची सोडेपर्यंत राज्यावर सव्वा 9 लाख कोटींचे कर्ज हे सरकार करणार आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
