#

Advertisement

Thursday, September 26, 2024, September 26, 2024 WIB
Last Updated 2024-09-26T12:35:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे राखीव जागांसाठी सर्वाधिक अर्ज

Advertisement

 एकूण 1350 उमेदवारी अर्ज : सगळ्यात जास्त देवळालीतून 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभेला 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. 85 ते 90 जागांसाठी 1200 इच्छुक उमेदवारांचे पक्षाकडे अर्ज प्राप्त झाले आहे. राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाट्याला येणाऱ्या राखीव जागांसाठी सर्वाधिक अर्ज आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये मोहोळ, फलटण, दिंडोरी, उदगीर, भुसावळ, मेहकर, मूर्तिजापुर, उमरेड, शहापूर, अंबरनाथ, माळशिरस विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 
आजअखेर एकूण 1350 उमेदवारी अर्ज आले आहेत. सगळ्यात जास्त देवळाली विधानसभा मतदारसंघात अर्ज आले आहेत. देवळाली मतदारसंघात 38 जणांनी अर्ज केले आहेत. नवाब मलिक यांच्या मतदारसंघात अणुशक्तीनगर विधानसभेत 9 जण इच्छुक आहेत तर मंत्री अनिल पाटील यांच्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात 13 जण इच्छुक आहेत. राज्यातील इतर मतदारसंघातून पण अनेक उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. इच्छुक उमेदवारांपैकी काही जणांनी थेट 100 रुपयांच्या बाँड पेपर उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार नसल्याचं आश्वासन लिहून दिलं आहे. उमेदवारांनी बाँडवर प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. राज्यातील 288 जागांपैकी कोणत्याही जागेसाठी आपल्या नावाचा विचार करण्यात आला नाही तर आपण बंडाळी करणार नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढणार नाही. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा देईल, असे इच्छुक उमेदवारांनी बाँडवर लिहून दिले आहे.