Advertisement
परळी : मुंडे भाऊ बहीण एक झाले आणि आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला असं म्हणत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करत आहेत. फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. जर त्यांना उमेदवारी दिली तर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजाभाऊ फड यांचे आव्हान असणार आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राज साहेब देशमुख बबन गीते सुदामते गुट्टे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता शरद पवार परळी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणती खेळी खेळतात, आणि कुणाला उमेदवारी मिळते? हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. ते रासपाचे युवा प्रदेशाध्यक्ष राहिले असून परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे एकत्र आले. यानंतर रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनीही महाविकास आघाडीचे साथ सोडत अजित पवार गटातून निवडणूक लढवली. आता याच कारणामुळे रासपचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनीही रास आपला सोडचिठ्ठी दिली आहे.
