Advertisement
20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 तारखेला निकाल
दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे.
निवडणुकीचं वेळापत्रक :
- निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
- अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
- अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
- मतदान : 20 नोव्हेंबर 2024
- मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
एकूण मतदार - 9 कोटी 63 लाख
- नव मतदार - 20.93 लाख
- पुरूष मतदार - 4.97 कोटी
- महिला मतदार - 4.66 कोटी
- युवा मतदार - 1.85 कोटी
- तृतीयपंथी मतदार - 56 हजारांहून जास्त
- 85 वर्षावरील मतदार - 12. 48 लाख
- शंभरी ओलांडलेले मतदार - 49 हजारांहून जास्त
- दिव्यांग मतदार - 6.32 लाख
- एकूण मतदान केंद्र - 1 लाख 186
- शहरी मतदार केंद्र - 42,604
- ग्रामीन मतदार केंद्र - 57,582
- महिला अधिकाऱ्यांची केंद्रे -
- एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार - 960
ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे.
