#

Advertisement

Monday, October 14, 2024, October 14, 2024 WIB
Last Updated 2024-10-14T19:51:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूर खिळखिळा होत असताना भाजप नेते मंडळी गायब ?

Advertisement

विधानसभा निवडणुकीतही अति आत्मविश्वास पक्षाला धोकादायक ठरणार 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होऊनही सोलापुरात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रदेशाद्यक्ष बावनकुळे, उपमुख्यंमत्री फडणवीस , पालकमंत्री पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळींनी जोर लावलेला असतानाही सोलापूरची जागा भाजप मिळवू शकला नाही. लोकसभेला अति आत्मविश्वास पक्षाला धोकादायक ठरलेला असतात विधानसभेला तरी पक्ष सोलापूरकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. परंतु, पक्षातील अनेक जण बाहेर पडत असताना कोणतीही ठोस भूमिका पक्षाकडून घेतली जात नसल्याने विधानसभा निवडणुकीतही पक्षातील काही मंडळींचा अति आत्मविश्वास पक्षाला धोकादायक ठरणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला सोलापुरात यश मिळाले नसताना विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून मोठी तयारी केली जाईल, असे वाटत असताना जिल्ह्यातील अनेक मतदार संघातील मातब्बरांनी शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी चिन्ह हाती घेतले आहे. मोहिते, निंबाळकर, पाटील अशी अनेक  मंडळींनी भाजप पक्ष  सोडला आहे. मोहोळ मतदार संघात दुफळी निर्माण झाली आहे. सोलापूर शहर मतदारसंघातही अनेकांनी उमदेवारीच्या कारणावरून थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे वरवर छान छान सुरु असल्याचे दिसत असले तरी सोलापूर जिल्ह्यात भाजप पक्ष खिळखिळा झाल्याप्रमाणे अंतर्गत स्थिती झाली आहे. पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची यादी वाढतच आहे. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येईल, तशी पक्षाला गळती लागणार असल्याची अंतर्गत चर्चा आहे.   

दरम्यान, या सगळ्यात आता सोलापूरच्या राजकारणातील मोठे प्रस्थ असलेले भाजपचे पक्ष प्रवक्ते माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्यावरही त्यांच्या नियंत्रणात असलेल्या बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्यासाठी दबाव आणला आहे. भाजपमध्ये आमच्या साहेंबाना सातत्याने डावलले जाते. प्रमुख कार्यक्रमाला बोलावले जात नाही,  स्थानिक कनिष्ठ मंडळी अगदी फ्लेक्सवर फोटो न टाकण्याचे फालतू राजकारण करतात, माजी मंत्री राहिलेले ढोबळे यांना त्या तुलनेत सन्मान दिला जात नाही, पक्षात अवहेलना होते, असे आरोप बहुजन रयत परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले आहेत,  यावर ढोबळे यांनी निर्णयासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ढोबळे यांनी भाजप सोडल्यास भाजपसाठी हा खूप मोठा धक्का असेल कारण ढोबळे यांची केवळ सोलापूर वरच नव्हे तर बहुजन रयत परिषदेच्या माद्यमातून संपूर्ण राज्यात  चांगली ताकद आहे. भाजपला लागलेली गळती रोखण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.