#

Advertisement

Thursday, October 3, 2024, October 03, 2024 WIB
Last Updated 2024-10-03T12:00:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुण्यात भाजपच्या बैठकीत जोरदार खडाजंगी

Advertisement

पुणे :  पुण्यात खडकवासला मतदारसंघावरुन भाजपच्या बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आमदार भीमराव तापकीर, नगरसेवक प्रसन्न जगताप आणि नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात ही खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोरच भाजप नेत्यांमध्ये मोठा वाद झाला. त्यामुळे या घटनेची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येत आहे. अमित शाह यांनी नुकतंच आपल्या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपापसात कोणताही वाद, मतभेद न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. असं असताना खडकवासला मतदारसंघावरुन भाजपच्या बैठकीत राडा झाला. 

खडकवासला मतदारसंघात भाजप बैठकीत आमदार भीमराव तापकीर त्याचबरोबर इच्छुक नगरसेवक प्रसन्न जगताप आणि भाजप नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्ष निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला. या बैठकीत भाषणाच्या मुद्द्यावरून इच्छुक उमेदवार आणि आमदारांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांना बोलू न दिल्याने बैठकीत नाराजी होती. या बैठकीत इच्छुक उमेदवारांचं गुप्त मतदान होतं, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पण यावेळी भाजप नेत्यांमध्ये वाद झाला. या वादानंतर खडकवासला मतदारसंघात भाजपमध्येच उमेदवारीवरून दोन गट आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.