#

Advertisement

Friday, October 11, 2024, October 11, 2024 WIB
Last Updated 2024-10-11T17:37:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

Advertisement

विधानसभेपूर्वीच अजित पवारांची घोषणा 

मुंबई :  सह्याद्री देवराईचे प्रमुख आणि अभिनेते सयाजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सयाजी शिंदे योग्य आदर आणि सन्मान राखणार असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. यावेळी अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांची आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे.
अजित पवार म्हणाले, सयाजी शिंदे यांनी अनेक सामाजिक कांमांचे नेतृत्व त्यांनी केले आहे. त्यांना झाडांची आवड आहे. त्यांचे सह्याद्री देवराईचे काम मोठे असल्याचे अजित पवार म्हणाले. आम्ही त्यांच्यासोबत सखोल चर्चा केली आहे. यावेळी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. सयाजी शिंदे यांचं सामाजिक क्षेत्रात चांगल काम आहे. त्यामुळे आम्ही आज आमच्या सोबत त्यांना घेत आहोत, अशी प्रतिक्रिया प्रवेशावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे समाधान आहे. त्यांनी एक चांगला निर्यण घेतला आहे.  विजयादशमीच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आनंद असल्याचे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा योग्य आदर आणि सन्मान राखणार आहे. यामध्ये कोणताही अडचण येणार नाही असे अजित पवार म्हणाले.