#

Advertisement

Friday, October 11, 2024, October 11, 2024 WIB
Last Updated 2024-10-11T17:29:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी

Advertisement

10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल 

अमरावती : भाजपमधून लोकसभा निवडणूक लढवलेल्या माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांच्या घरी हैदराबादहून धमकीचे पत्र आल्याने खळबळ उडाली आहे. आमिर नामक इसमाच्या नावाचा उल्लेख पत्रात असून नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचार करण्याची धमकी या पत्रातून देण्यात आलीय. तसेच, राणा दाम्पत्याच्या अमरावतील येथील घरासमोर गाय कापण्याची देखील धमकी पत्रातून देण्यात आली आहे. तर, पत्रात पाकिस्तान जिंदाबाद, असाही उल्लेख आहे. याबाबत, रवी राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी शहरातील राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, या पत्रामुळे व पोलिस तक्रार दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 
नवनीत राणा यांना पाठविण्यात आलेल्या धमकी पत्राद्वारे संबंधित व्यक्तीने राणा दाम्पत्याकडे 10 करोड रूपयाच्या खंडणीची मागणी केली असून खंडणी दिली तरच पिच्छा सोडणार असल्याचा उल्लेख पत्रात आहे. या पत्रात नवनीत राणा यांचे पति रवी राणा यांच्या विषयी वादग्रस्त शब्दांचा वापर करण्यात आला असून मी हैदराबादचा आहे, असेही उल्लेख पत्रात आहे.