#

Advertisement

Friday, October 4, 2024, October 04, 2024 WIB
Last Updated 2024-10-04T10:44:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माढा विधानसभा मतदार संघात मोठा पेच

Advertisement

आमदार बबनदादा शिंदे  यांची मुलाला अपक्ष उतरविण्याची तयारी 

सोलापूर : माढा विधानसभा मतदार संघातून सलग सहा वेळा मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेले अजितदादा गटाचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी मात्र अजितदादांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. यावेळी ते आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवत असून त्यांनी शरद पवारांची यासंदर्भात अनेक वेळा भेट घेतली आहे.  रणजीत शिंदे यांच्यासाठी उमेदवारी मागितली असून जर साहेबांनी उमेदवारी दिली नाही तर आपण मुलाला अपक्ष उभा करू अशी भूमिका घेतल्याने अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. महायुतीतील तुमचं फिक्स तिकीट का नाकारता या विषयावर त्यांनी तो विषय आता संपलेला आहे, अशा एका वाक्यात उत्तर देत अजितदादा व महायुतीला निरोप दिला आहे. 
आमदारांचे पुतणे धनराज शिंदे हे बंडखोरी करत असल्याचे निदर्शनास सांगताच आमचा घरचा विषय ही संपला असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. भाजप आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील देखील तुतारी कडून निवडणूक लढवण्यास प्रयत्नात असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत, निवडणुकीत कोणीही येऊ दे आम्हाला फरक पडणार नाही, अशी भूमिका आमदार शिंदे यांनी स्पष्ट केली. काही दिवसापूर्वी अजितदादांची जन सन्मान यात्रा माढ्यात आली असता बबनदादा शिंदे यांनी त्यास हजेरी लावत मोठे शक्ती प्रदर्शनी केले होते. आता शरद पवारांकडे उमेदवारी मागितल्याने अजित पवार यांना माढ्यात कोणाला उभे करायचे हा प्रश्न पडणार आहे. 

अजित दादांना उमेदवार शोधावे लागणार 
आमदार बबनदादा शिंदे यांनी आता मात्र तुतारी न मिळविल्यास अपक्ष मुलाला उतरवणार अशी भूमिका घेतल्याने बबन दादांचा अजित पवार यांच्यावरील विश्वास संपला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमदार शिंदे यांचे दुसरे बंधू आणि करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी यापूर्वीच गेल्यावेळी प्रमाणे आपण याही वेळी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे, अजित दादांना आता या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार कोण द्यायचा हा पेच निर्माण होणार आहे.