#

Advertisement

Friday, October 4, 2024, October 04, 2024 WIB
Last Updated 2024-10-04T11:27:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिल्यामुळं...

Advertisement

सुप्रिया सुळे म्हणाल्या पक्षातील काहीजण नाराज पण...

पुणे : हर्षवर्धन पाटील यांचं कुटुंब आणि पवार कुटुंब यांचे सहा दशकांचे संबंध आहेत, ते पुन्हा आमच्याकडे येत आहेत, याचा आनंद आहे. मधल्या काळात विचार वेगळे झाले होते मात्र आमचे संबंध कायम होते. पण, हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील काहीजण नाराज झाले असतील तर ते साहजिक आहे. कारण प्रत्येकाला वाटते की आपल्याला उमेदवारी मिळावी असे सुळे म्हणाल्या.
हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देताना इंदापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली असल्याचे सुळे म्हणाल्या. मात्र, त्यांना उमेदवारी दिल्यामुळं जे नाराज आहेत, त्यांची समजूत काढणं हे आमचं काम आहे ते आम्ही करु असेही सुळे म्हणाल्या. अजित पवारांच्या पक्षाने बारामतीतून कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. मात्र आमच्या पक्षांमध्ये सक्षम उमेदवार आहे. फक्त बारामतीतच नाही तर महाविकास आघाडीमध्ये सर्वच ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत, कुणीही अति आत्मविश्वासात राहू नये असेही सुळे यावेळी म्हणाल्या.