Advertisement
मुंबई : महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीआधी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह कायम ठेवलं आहे. लोकसभा निवडणुकीत याच पिपाणी चिन्हाचा मोठा फटका शरद पवार गटाला बसला होता.
विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हावर बंदी नसणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिपाणीचा पुन्हा तुतारीला फटका बसण्याची शक्यता आहे.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं चिन्ह हे तुतारी आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत पिपाणीमुळे तुतारीला फटका बसल्याची तक्रार शरद पवार गटाने केली होती.. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या होत्या.. नाशिकसह सर्वच जागांवर 4 लाखांहून अधिक मतदान पिपाणीला पडले होते. विशेषतः सातारा लोकसभेत पिपाणी चिन्हामुळे त्यांच्या उमेदवाराला पराभवाचेही तोंड पहावे लागले होते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शरद पवार गटाने पिपाणी चिन्ह गोठवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह कायम ठेवल आहे. तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्षष्ट दिसतो, त्याचा आकार वाढवण्यात यावा ही मागणी मात्र आयोगाने मान्य केली आहे.
निवडणुकीत चिन्ह किती महत्त्वाचं असतं, याचा अनुभव राष्ट्रवादी शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीत आला होता... तुतारी वाजवणारा माणूस अशी शरद पवारांच्या पक्षाची अधिकृत निशाणी... मात्र याच तुतारीसारखी दिसणारं पिपाणी हे निवडणूक चिन्ह लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना देण्यात आलं... त्यामुळं राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांना मोठा फटका बसला होता.
