#

Advertisement

Thursday, October 3, 2024, October 03, 2024 WIB
Last Updated 2024-10-03T11:41:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मी आरपीआयचे नेतृत्व सोडायला तयार... : रामदास आठवले

Advertisement

सातारा :  राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी केली आहे. पुढील काही दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास आठवले यांनी साताऱ्यात मोठं विधान केलं आहे.

प्रकाश आंबेडकरयांनी आरपीआय सोबत यावे. मी आरपीआयचे नेतृत्व सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता रामदास आठवले यांच्या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकर नेमकं काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला 8 ते 10 जागा मिळाव्यात, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. राज्यात महायुतीच्या 170 च्या पुढे जागा निवडून येतील, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलीय. राज्यात महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तर आम्हाला गृहीत धरू नका, असा इशारा देखील रामदास आठवले यांनी दिला आहे.सातारा :