Advertisement
शरद पवारांचा घरचा उमेदवार निश्चित
बारामती : बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा बारामतीच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. बारामतीमध्ये आम्ही आभार दौरा आणि स्वाभिमान यात्रा काढली त्यावेळी लोकांचा विश्वास दिसून आला. महाविकास आघाडी म्हणून जो काही निर्णय असेल तो मान्य केला जाईल. आमच्यापर्यंत काही निरोप आलेला नाही. मात्र, निर्णय आपल्या सर्वांनाच लवकरच कळेल. बारामतीचा निर्णय शरद पवार साहेब घेतील. असे, उमेदवारीबाबत युगेंद्र पवार यांनी सांगितले.
बारामतीमधून अजित पवार हेच निवडणुकीच्या रिंगणात असतील हे पक्षाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून अजितदादांच्या विरोधात कोणता उमेदवार दिला जाणार? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये चांगलीच तयारी सुरू केली आहे.
