Advertisement
शरद पवार यांच्याकडून या कारणामुळे अधिकृत घोषणा अद्याप नाही
माळशिरस : महाविकास आघाडीचे किंवा महायुतीचे अद्याप जागावाटप झाले नसले तरी माळशिरसची जागा शरद पवार गटाकडे असून येथील उमेदवारही उत्तम जानकर हेच असणार आहेत. जानकर हे धनगर समाजाचे असले तरी त्यांनी खाटीक धनगर प्रमाणपत्र मिळावीत अनुसूचित जातींमधून गेल्यावेळी विधानसभा लढली होती, जानकर याना धनगर समाजाची ही नाराजी भोंवणार आहे. याच कारणातून अद्याप त्यांची अधिकृत उमेदवारी शरद पवार यांनी केलेली नाही. या मतदार संघात अन्य उमेदवार देता येऊ शकतो का ? याबाबत महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची याकामी महत्वाची भूमिका मानली जाते आहे.
माळशिरस तालुक्यात धनगर समाजाचे निर्णायक मतदान असले तरी पारंपरिक हे मतदान नेहमीच भाजपच्या मागे राहत आले आहे. यातच उत्तम जानकर यांनी मागास जातीत घुसखोरी केल्याचा आक्षेप मागासवर्गीय नेते करू लागल्याने जानकर याना हि नाराजी भोवणार आहे. माळशिरस मतदारसंघात जवळपास १५ टक्के अनुसूचित जातीचे मतदान असून यांची समजूत काढणे हा जानकर यांच्या समोरील आव्हान असणार आहे. याशिवाय गेली ३५ वर्षे मोहिते पाटील यांच्याशी सुरु असलेला टोकाचा संघर्ष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपला आणि मोहिते व उत्तम जानकर यांचे मनोमिलन झाले आहे. मात्र, गावोगावी वर्षानुवर्षे मोहिते पाटील याना विरोध करणारा गट व जानकर याना विरोध करणारा मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचे अद्याप मनोमिलन झाल्याचे दिसत नाही. मोहिते पाटील आणि जानकर याना एकत्रित येत मोहिते पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना विश्वास द्यावा लागणार आहे. याशिवाय तालुक्यातील निर्णायक धनगर समाज आपल्याकडे वळवणे हि जानकर यांच्या पुढील आव्हान आहे. या निवडणुकीत गावोगावी असणारे जानकर विरोधी मोहिते पाटील गटाचे मतदार आणि धनगर समाजाच्या जीवावर सातपुते विजयापर्यंत पोचणार का हेच दिसणार आहे.
