#

Advertisement

Friday, October 4, 2024, October 04, 2024 WIB
Last Updated 2024-10-04T16:42:18Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नगरमध्ये इच्छुकांच्या मुलाखती सुरु असतानाच राडा

Advertisement

भाजपपाठोपाठ काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर 

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगाव मतदारसंघासाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना गोंधळ उडाल्याचा प्रकार घडला होता. या पाठोपाठ आता काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसच्या विधानसभा निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना दोन गटात गोंधळ उडाल्याने खळबळ उडाली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. अनेक पक्षांकडून सध्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विधानसभा निहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या. या मुलाखती सुरु असताना दोन्ही गटात गोंधळ उडाला. काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांचा धिक्कार करत काँग्रेसच्या दुसऱ्या गटाकडून घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आ. मुज्जफर हुसेन यांच्यासमोर काँग्रेसच्या दोन गटात गोंधळ उडाला. काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्याविरोधात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार हेमंत ओगले यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन करत घोषणाबाजी करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.