Advertisement
छगन भुजबळांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत ?
नाशिक : छगन भुजबळ यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत.आता मला आराम करायचं आहे, असं वक्तव्य भुजबळ यांनी केल आहे. छगन भुजबळांच्या रिटायरमेंटच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता मला आराम करू द्या म्हणत भुजबळांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. स्वतःच्या रिटायरमेंटचे संकेत देतानाच तुम्ही आता समाजकार्याची जबाबदारी घ्या असं समीर आणि पंकज भुजबळांना त्यांनी सांगितल आहे.रिटायरमेंटचा निर्णय घेताना कुणाला विचारण्याची गरज नसल्याचंही भुजबळांनी म्हटल आहे.
भुजबळांनी खरोखरच निवृत्तीचे संकेत दिले की भावनिक आवाहन करून राजकीय खेळी केली, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीची वाट पाहणाऱ्या भुजबळांच्या पदरी निराशा आली होती. त्यानंतर नाराज झालेल्या भुजबळांनी आता विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. गेल्या 2 दशकांपासून येवला मतदारसंघावर भुजबळांचं एकहाती वर्चस्व आहे. पुतण्या समीरसाठी नांदगाव मतदारसंघातून छगन भुजबळ फिल्डिंग लावत आहेत. पुतण्या समीरला नांदगावमध्ये पाय रोवता यावेत म्हणून नेहमीप्रमाणे भुजबळांनी भावनिक साद घातल्याची चर्चा आहे. भुजबळांनी भावनिक साद घालून पुतण्यासाठी सेफ ग्राऊंड तयार केल्याचंही बोललं जात आहे.
