#

Advertisement

Friday, October 4, 2024, October 04, 2024 WIB
Last Updated 2024-10-04T17:33:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मला जीवे मारुन टाकण्याचा प्रयत्न झाला : आमदार नितीन देशमुख

Advertisement


अकोला : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारला तेव्हा नितीन देशमुख हे सुद्धा इतर आमदारांसोबत सुरता गेले होते. पण नितीन देशमुख रातोरात परत आले होते. त्यावेळी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा धक्कादायक दावा नितीन देशमुख यांनी केला आहे. मला त्यावेळी जीवे मारुन टाकण्याचा प्रयत्न होता, असा खळबळजनक दावा नितीन देशमुख यांनी केला. ते अकोल्यात कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्यासमोर मंचावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील होते.
शिंदे गटाने माझी चौकशी लावली खरी, पण आता माझ्या मुलासह आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचीही ACB चौकशी लावली. पण आपण कधीही डगमगलो नाही. मी सुरतला गेलो होतो, तेव्हा माझ्यासोबत घात करण्याचा प्रयत्न झाला. मला इंजेक्शन देण्यात आले होते. तेव्हा बातमी पसरली की आमदार देशमुखांना हृदय विकाराचा झटका आला. मला कोणताही झटका आला नव्हता. त्यांना माझा घातपात करायचा होता का?, असं नितीन देशमुख म्हणाले.
मला भाजपच्या एका आमदाराने सांगितलं. दिल्लीवरून एक फोन आला होता, कोणत्याही परिस्थितीत नितीन देशमुख परत जाता कामा नये, मारून टाकायचं काम पडलं तरी गेम करून टाका. तेव्हा टीव्हीवर बातमी पसरवली हृदय विकाराचा झटका आला आणि दिल्लीवरून फोन येतोय, ऐकत नसेल तर मारून टाका. हे सर्व मला भाजपच्या आमदाराने सांगितलं”, असा खळबळजनक गौप्यस्फोट नितीन देशमुख यांनी केला.