#

Advertisement

Saturday, October 5, 2024, October 05, 2024 WIB
Last Updated 2024-10-05T10:48:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

रामराजे निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करणार ?

Advertisement

अजित पवारांना आणखी एक धक्का : फलटण येथे रात्री कार्यकर्त्यांचा मेळावा 

 फलटण : लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात उघडपणे दंड थोपटणारे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. याबाबत आजच रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 
सूत्रांच्या माहितीनुसार, रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी रात्री फलटण येथील खटके वस्ती येथे कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन त्यांच्याच कलाने निर्णय घेतील, अशी माहिती आहे. परंतु, रामराजे नाईक निंबाळकर यांनी घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय पक्का केल्याची माहिती आहे. रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण देखील अजित पवार यांची साथ सोडतील, असे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी एका कार्यक्रमात नुकतीच फोनवरुन दीपक चव्हाण यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतरही दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांची साथ सोडल्यास हा अजित पवार यांच्यासाठी दुहेरी धक्का ठरेल.
कालच भाजपचे इंदापूर मतदारसंघातील नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटील यांना आपल्या गोटात आणून शरद पवार यांनी अजितदादा गटाच्या दत्ता भरणे यांच्याविरोधात तगडा उमेदवार पक्षात जोडला होता. हा भाजप आणि अजित पवार गट दोघांसाठी मोठा धक्का ठरला होता.