Advertisement
शिवसेना उद्धव ठाकरे गटाची घोषणा
मुंबई : मुंबईपासून-नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना महापालिकेच्या निवडणुकांबद्दल मोठी घोषणा केली आहे. आता शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळं महाविकास आघाडीत फुट पडली का? असा सवाल केला जात आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, झेडपीमध्ये शिवसेना यूबीटी स्वबळावर लढणार असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसं सांगितलं आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.
नागपूरपासून मुंबई पर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. एकदा आम्हाला पाहायच आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूर मध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार.कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्षवाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षानी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी,' असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
