#

Advertisement

Saturday, January 11, 2025, January 11, 2025 WIB
Last Updated 2025-01-11T10:57:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात वाल्मिकी कराडच्या मुला विरोधात तक्रार

Advertisement

सोलापूर : वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडसुद्धा अडचणीत येण्याची  शक्यता आहे. सुशील कराडवर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सुशीलने त्याच्या मॅनेजरला घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप आहे. पीडित मॅनेजरच्या पत्नीने याबाबत तक्रार दिली आहे.
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड यांच्यावर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.  मॅनेजरला घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आणि दोन ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मॅनेजरच्या पत्नीनं याबाबत सुशील कराड आणि त्याचा मित्र अनिल मुंडे, गोपी गंजेवार यांच्या विरोधात सोलापूर MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी त्याची दखल न घेतल्यानं पीडित महिलेच्या पत्नीनं सोलापूर जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल केली आहे. 13 जानेवारीला याबाबत सुनावणी होणार आहे. बीडनंतर सोलापूरातदेखील ठिणगी पडल्याचे पाहायला मिळतेय. तसंच, ही फिर्याद लवकरात लवकर दाखल करण्यात यावी अशी मागणी पिडीत महिला आणि त्यांच्या वकिलांनी केली आहे.