#

Advertisement

Thursday, January 23, 2025, January 23, 2025 WIB
Last Updated 2025-01-23T11:40:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवार यांचं "त्या" कारशी कनेक्शन काय?

Advertisement

मुंबई : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी दररोज नवं नवीन खुलासे होत आहेत. देशमुख हत्येप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आलीय. पण अद्याप आरोपी कृष्णा आंधळेला ताब्यात घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. अटकेतील आरोपींची सीआयडी आणि एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. अशात संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड कसा फरार झाला याबद्दलचा एक सीसीटीव्ही फूटजे समोर आला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड शिवलिंग मोराळेंच्या कारमधून राज्यभर फिरला, अशी सूत्रांची माहिती आहे. दोन सीसीटीव्ही फूटजे समोर आले आहेत, यात तिच कार दिसतंय, जी मोराळेंची असून याच्या कारमधूनच वाल्मिक सीआयडीसमोर शरण आले होते. शिवलिंग मोराळेंची कार वाल्मिकसोबत राज्यभर कसा फिरला असा प्रश्न उपस्थितीत होतोय. मोराळेंचीच कार अजित पवारांच्या ताफ्यात होती, का असा प्रश्नही उपस्थितीत होत आहे. 


तपास यंत्रणेवर भरोसा राहिला नाही, असं संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. 'वाल्मिक कराड राजकीय वरदहस्ताने उपचार सुविधा उपभोगतो, असं आरोप करत धनंजय देशमुखांनी तपासाबाबत शंका व्यक्त केलीय. आरोपींची सीसीटीव्ही समोर येतात मग पोलिसांना का मिळत नाही,  असा सवालही देशमुखांनी विचारला आहे.