#

Advertisement

Wednesday, January 22, 2025, January 22, 2025 WIB
Last Updated 2025-01-22T11:53:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"आर्टी"चा मातंग आणि तत्सम जातींच्या उन्नतीकरीता उपक्रम

Advertisement

ऍड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांनी यांची माहिती 

पुणे : मातंग आणि तत्सम जातींच्या उन्नतीकरीता विविध कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षण, विविध योजना राबविण्यात येत आहे. उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांनी केले आहे.  आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांच्याशी संबंधित विषयावर ऍड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांनी चर्चा केली होती. यावेळी वारे यांनी सादर माहिती दिली.
याबाबतची अधिक माहिती देताना वारे यांनी सांगतिले की, ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत आहे. युवकांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात अर्ज केल्यामुळे तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या होत्या. त्यावर तांत्रिक विभागाने गुगल फार्म ऐवजी आर्टीच्या संकेतस्थळावर उमेदवारांना नोंदणीसाठी नवीन अर्ज उपलब्ध करुन दिला आहे. उमेदवारांनी याठिकाणी नोंदणी केल्यानंतर कौशल्य प्रशिक्षणानुसार त्यांच्या अर्जाची छाननी करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. जे उमेदवार स्वंयरोजगारासाठी इच्छुक आहेत, त्यांच्या व्यवसायाकरीता आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु आहे. इच्छुक उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर करिअर हा पर्याय निवडावा आणि ऑनलाईन नोंदणी करावा आणि ऑनलाईन अर्ज करावा, असे ऍड. कोमलताई ढोबळे-साळुंखे यांनी आवाहन करण्यात केले आहे.