Advertisement
चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान
मुंबई : उद्धव ठाकरे शिवसेनेने 2019 ला ब्लंडर युती केली होती. ते त्यांना आता कळाले आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि फडणवीसांना बाजूला करून जी युती केली. त्यांच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे पोहचत होते, बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी तिलांजली दिली जात होती. या चुका त्यांना कळाल्यात, कॉंग्रेसच्या विचारांवर चालून उध्दव ठाकरेंची शिवसेना पुढे जाऊ शकत नाही. परंतू महाराष्ट्रात महायुतीच आहे. आम्ही विजयातून कोणताही उन्माद आणणार नाही. महायुतीला तडा जाईल असं करणार नाही. आमच्यातून स्वतंत्र लढलेल्यांना आम्ही पक्षातून काढलं आहे. तुर्तास कुठल्याही पध्दतीने आमच्या विरोधात लढलेल्यांना पक्षात घेऊ नये असे ठरलंय. भविष्यात आम्ही तीन नेत्यांचा विचार घेऊन पुढे जाऊ असेही चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले.विरोधकांकडे विकासाचे काही मुद्दे असतील तर फडणवीसजी त्यांना भेटतील. देवेंद्रजींनी सांगितलंय की ज्यांना विकासावर एकत्र यायचं त्यांनी चर्चेला आलं पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
