#

Advertisement

Wednesday, January 15, 2025, January 15, 2025 WIB
Last Updated 2025-01-15T13:56:34Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुणे-नाशिक रेल्वे मार्गात आता संगमनेर नाही

Advertisement

रेल्वेमार्गाचा नवा आराखडा तयार

मुंबई : खोडद (ता. जुन्नर) येथे जीएमआरटीचा महाकाय दुर्बिणीचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प फक्त भारतासाठीच नाही तर २३ देशांसाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पाचे स्थलांतर करण्यास शास्त्रज्ञांचा विरोध होता. कारण त्यामुळे भारतातील या शक्तीशाली केंद्राची क्षमता कमी झाली असती. यामुळे  रेल्वे मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी जीएमआरटी प्रकल्पाला धक्का न लावता पुणे-नाशिक नवीन रेल्वेमार्गाचा नवा आराखडा तयार केला. त्यामुळे पुणे नाशिक रेल्वे मार्गात आता संगमनेर येणार नाही. पुण्यावरुन अहिल्यानगर, शिर्डीमार्गे नाशिककडे असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग सेमीहायस्पीड असणार आहे. एकूण 235 किलोमीटरचा हा मार्ग होता. आता नवीन मार्गामुळे त्याचे अंतर वाढण्याची शक्यता आहे. सेमीहायस्पीड रेल्वे मार्गावर 200 किलोमीटर  प्रतितास वेगाने रेल्वे धावणार आहे. हा संपूर्ण मार्ग सुरुवातीपासून विद्युतीकरण करण्यात येणार आहे. मार्गावर सहा कोचची रेल्वे धावणार आहे. पुणे-नाशिक प्रवास रस्ते मार्गाने सध्या सहा तासांचा आहे. परंतु सेमीहायस्पीड मार्गामुळे हा प्रवास अवघ्या 1 तास 45 मिनिटांत पूर्ण होणार आहे.