#

Advertisement

Wednesday, January 15, 2025, January 15, 2025 WIB
Last Updated 2025-01-15T14:10:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाकुंभात साध्वी हर्षा रिछारिया यांची सर्वाधिक चर्चा

Advertisement

प्रयागराज : महाकुंभ सुरु आहे. या महाकुंभातील बातम्यांमध्ये सर्वाधिक चर्चा साध्वी हर्षा रिछारियावर होत आहे. सोशल मीडियावर 13 जानेवारी रोजी त्यांचे 667K फॉलोअर्स होते. त्यानंतर एका दिवसांत 14 जानेवारी रोजी त्यांच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड वाढली. त्यांचे फॉलोअर्स एक मिलियनपर्यंत पोहचले. एका दिवसांत त्यांचे 3 लाख 33 हजार फॉलोअर्स वाढले आहेत. मॉडल आणि एंकर असलेल्या हर्षा रिछारिया दोन वर्षांपूर्वी साध्वी बनल्या. प्रयागराजमधील महाकुंभात त्यांच्याबाबत नवीन वाद समोर आला आहे. हर्षा यांना महाकुंभातील पहिले अमृत स्नान करु देणे आणि महामंडलेश्वर यांच्या रथावर बसण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. ज्योतिष पीठातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले की, महाकुंभात ही परंपरा सुरू करणे पूर्णपणे चुकीचे आहे. ही विकृत मानसिकता आहे. महाकुंभात चेहरेचे सौदर्यं नाही तर ह्रदयाची सुंदरता पाहिली जावी. मनाची सुंदरता पाहिली जावी. ज्याने अजून संन्यास घ्यावा की लग्न करावे, हे निश्चित केले नाही, त्यांना संत-महात्मांच्या शाही रथावर स्थान देणे चुकीचे आहे. भक्त म्हणून त्यांचा सहभाग ठीक आहे, पण भगवे कपडे परिधान करुन शाही रथावर बसणे पूर्णपणे चुकीचे आहे. ज्या प्रमाणे पोलिसांचा गणवेश केवळ पोलीस दलात सहभागी असणाऱ्यांना मिळतो, तसे भगवे वस्त्र फक्त संन्यासींना मिळते. 

हर्षा रिछरिया सर्वात सुंदर साध्वी 
महामंडलेश्वर कैलाशानंद महाराज यांची हर्षाशिष्या आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळमधील हर्षा या स्वाधी होण्यासोबत एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यांचे फॅन त्यांना महाकुंभ 2025 फेम असा किताब देत आहे. एका रात्रीत त्या प्रचंड प्रसिद्ध झाल्या. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होणे आणि फॉलोअर्स वाढले आहे. महाकुंभ 2025 मध्ये आलेल्या सर्वात सुंदर साध्वी त्यांना म्हटले जात आहेत.