#

Advertisement

Monday, January 20, 2025, January 20, 2025 WIB
Last Updated 2025-01-20T11:49:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

...अन्यथा परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही

Advertisement

 दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून मोठी अपडेट 

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले आहे. शाळांना अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर लॉगिन क्रेडेन्शियल्स सबमिट करून विद्यार्थ्यांच्या वतीने प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.
दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना आपले हॉलतिकीट शाळा अधिकाऱ्यांकडून घ्यावे लागतील. अधिकृत वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान घेतली जाणार आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर हॉल तिकीट घेऊन जाणे आवश्यक आहे. कारण त्याशिवाय त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. 
दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल? 
दिलेल्या सूचनांचे पालन करून शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या वतीने हॉल तिकीट डाउनलोड करू शकते. यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जा. होमपेजवर उपलब्ध असलेल्या एसएससी हॉल तिकीट 2025 लिंकवर क्लिक करा आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स सबमिट करा. महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट 2025 स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती विद्यार्थ्यांना वितरीत करा.