Advertisement
शाहू शिक्षण संस्थेत प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा
पुणे : आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी उत्सवाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा आहे. आज आपल्याला पवित्र अणि समृद्ध संविधान मिळाले. गुलामगिरीत खितपत पडलेला भारतीय आजच्या दिवशी स्वतंत्र भारताचा मालक झाला तोच हा दिवस. आपल्या देशात सर्वात मोठी लोकशाही अवतरली तो हा दिवस. मात्र आता यापुढे देशाच्या प्रगतीची सुत्रे तरूणाईच्या हाती असणार आहेत, असे प्रतिपादन ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले.
भोसरी येथील शाहू शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले.
विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ॲड. कोमलताई म्हणाल्या की,आज आपल्या लोकशाहीला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्त अमृत मोहोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आज आपला देश अमृत मोहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. ही घटना अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. पण, या साडेसात दशकात आपण नेमकं काय मिळवलं आणि काय गमावल याचा विचार करायला हवा. देश आणि राज्यात अनेकदा सत्तांतर झाली. विविध विचारांचे पक्ष आणि संघटना उदयाला आल्या. अशात मुल्यांकन राजकारण बाद होत चालले आहे. हितसंबंधाच्या विध्वंसक खेळालाच आपण राजकारण म्हणायला शिकलो आहोत. मतांसाठी जात, धर्म, प्रदेश आणि महापुरुषांना वेठीस धरण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात रूढ झाला आहे. गटातटाच्या छावण्या उभ्या राहत आहेत. भ्रष्ट राजकारण आणि भ्रष्ट नोकरशाही या दोन गोष्टींना सामाजीक मान्यता मिळायला लागली आहे. सुशक्षित तरुणाई भ्रमनिराशेच्या दरीत सापडली आहे. कृषिप्रधान देश अशी ओळख असलेल्या आपल्या देशात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. हिंदू, मुस्लिम, शिख असे जातीयवादी शब्द निरसंस्काराचे झाले आहेत. आमच्यात एकमेकांविषयी द्वेष निर्माण होत चालला आहे. ब्राम्हण, माराठा, ओबिसी, आदिवासी, भटक्या विमुक्ती अशा परस्पर लढाया सुरु झाल्या आहेत. हे सगळं बघताना असं वाटत की, यासाठीच का, आपल्या क्रांतिकारकांनी रक्त सांडून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले का? आज ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात आपण गगनभरारी घेतली असली तरी माणुसकीच्या भिंती मात्र ढासळत चालल्या आहेत. निर्भयपणे, तटस्थपणे आपल्याला लिहता येत नाही. सत्य बोलता येत नाही. लोकशाहीची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. पण, या विषयी कोणी काही बोलण्यास तयार नाही. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला मीडिया देखील सत्तेच्या दावणीला बांधला आहे. देशाला चारही बाजुने संकटाचा वेढा पडलेला आहे. हा वेढा उठविण्याचे काम आता तरुणाईला करावे लागणार आहे. परंतु, तरुणाई सोशल मीडियात अडकली आहे. आपल्या आजुबाजुला काय चालले आहे, याचे भानही त्यांना राहिलेले नाही. जग फार वेगाने प्रगती करीत आहे त्याच्या दुप्पटीने देशातील समस्या वाढत आहेत. महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, अन्याय सुरु आहे. हे लक्षात घेता आपण आपल्या देशाप्रती आपली कर्तव्य पार पाडली पाहिजेत. आपल्या लोकशाही पुढे अनेक आव्हाने आहेत. त्याचा बिमोड करायचा असेल तर नागरिकांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, शांतता, विकास, मानवतावाद, या लोकशाही मुल्यांना प्राधान्य देणाऱ्या लोकप्रतिनिधीची निवड केली पाहिजे. तसं झालं तरच घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हंटल्याप्रमाणे राजकीय लोकशाहीचं सामाजीक लोकशाहीत रूपांतर होऊ शकेल. आणि हा बदलू फक्त युवापिढी घडवू शकते. मला खात्री आहे की, भारतीय प्रजासत्ताकदिन चिरायू होण्यासाठी आपण नक्कीच योगदान घ्याल. पुन्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
