Advertisement
डॉक्टरांनी दिला विश्रांतीचा सल्ला
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली असून त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ,मंगळवार दोन दिवस शरद पवार हे विदर्भ दौऱ्यावर होते. मात्र शरद पवारांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. शरद पवारांची तब्येत बिघडल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. डॉक्टरांनी शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मागील ८ ते १० दिवसांपासुन पवार यांना खोकल्याचा त्रास सुरु आहे. परिणामी त्यांना बोलताना, भाषण करताना व नागरीकांशी संवाद साधताना मर्यादा येत आहे. या कारणास्तव डॉक्टरांनी पवार यांना पुढील चार दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पक्ष बांधण्यासाठी शरद पवार हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. अशावेळी शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम पुढील चार दिवसांसाठी रद्द करण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
