#

Advertisement

Friday, January 31, 2025, January 31, 2025 WIB
Last Updated 2025-01-31T12:01:29Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बार्शीत आढळल्या सर्वात जास्त "बोगस लाडक्या बहिणी"

Advertisement

बार्शी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत परराज्यातील बोगस लाभार्थींच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. लातूर, सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून परराज्यात राहणाऱ्या महिलांनी महाराष्ट्रात १,१७१ अर्ज भरले. मात्र, प्रत्यक्ष तपासात या अर्जदार उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानातील असल्याचं उघड झाल आहे.  याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एकट्या बार्शी तालुक्यात 22 बोगस अर्ज आले होते. त्यांना मिळणारे पैसे आता तातडीनं थांबवण्यात आले आहेत.
सरकारी वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करण्याची सुविधा दिली होती.  बनावट लॉगिन आयडीचा गैरवापर करुन हा घोटाळा करण्यात आला. ‘मुनमुन ठाकरे, अंगणवाडी सेविका, हजारवाडी, जि. सांगली’ ‘अनवरा बेगम, अंगणवाडी सेविका, बोरगाव बु., जि. लातूर’  या 2 बनावट आयडीद्वारे तब्बल 1,171 अर्ज भरले गेले. प्रत्यक्ष चौकशीत अशा अंगणवाडी सेविका नसल्याचं उघड झाले आहे. सध्या पोलीस, महसूल, तसंच महिला व बालविकास विभाग या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.