Advertisement
सोलापूर :पुण्यापाठोपाठ सोलापुरातही गिया बार्रे आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. पुण्यात एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकुण रुग्णसंख्या आता 101 वर गेलीये. त्यातच सोलापुरातील एका तरूणाच्या मृत्यूने आता महापालिकेसह राज्याची आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. अशातच आता सोलापुरात जीबीएसचे दोन संशयित रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. या दोन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यात ज्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे तो देखील सोलापुराचाच होता. गिया बार्रे सिंड्रोममुळे (जीबीएस) झालेला महाराष्ट्रातील हा पहिलाच मृत्यू आहे. मृत रुग्ण 40 वर्षांचा होता. त्याला पुण्यात असतानाच जीबीएसची लागण झाली होती.
