#

Advertisement

Friday, January 31, 2025, January 31, 2025 WIB
Last Updated 2025-01-31T18:02:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पंकजा मुंडे यांच्या विरोधात प्ल्यानिंग झाले होते...!

Advertisement

बीड : धनंजय मुंडे यांनी किती सोसावं?” असे विधान भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता यावर  शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रींवर गंभीर आरोप केले आहेत.
नामदेव शास्त्री महाराज यांनी संपूर्ण प्रकरण तपासून आपली भूमिका मांडली पाहिजे होती. भगवान गडाच्या मागून धनंजय मुंडे हे राजकारण करत आहेत. नामदेव शास्त्री महाराज यांची भूमिका मला तरी पटलेली नाही. पंकजा मुंडे यांना सुद्धा धनंजय मुंडे यांनी त्रास दिला आहे. पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर २०१६ ला भाषण करु नये यासाठी काय प्लानिंग करावी यासाठी हे नामदेव शास्त्री महाराज आणि धनंजय मुंडे यांनी दिल्लीतील हयात हॉटेल मध्ये मीटिंग केली होती. त्यानंतर पंकजा ताई यांना भगवान गडावर येण्यापासून रोखण्यात आला, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी केला. धनंजय मुंडे हा समाजाचा सुद्धा होऊ शकत नाही. याने समाजातील लोकांच्या हत्या केल्या आहेत. याला मंत्रिपद प्यार झालं आहे त्यामुळे तो मंत्रिपदासाठी राजीनामा देत नाही. त्याने राजीनामा द्यावा आणि चौकशी होऊ द्यावी. नंतर ते दोषी आढळले नाही तर त्यांना मंत्रिपदासाठी पुन्हा मुख्यमंत्री घेतील ना, असेही राजाभाऊ फड म्हणाले. 


धनंजय मुंडे हे दीड लाख मतांनी निवडणूक तर आले, पण सगळे बोगस मतांचा सगळं कारभार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत बूथ ताब्यात घेण्यात आले आणि बोगस मतदान करण्यात आलं. आणि तोच प्रकार हा विधानसभेत परळी तालुक्यात झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल २०० हून अधिक बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं त्यामुळे धनंजय मुंडे हे दीड लाख मतांनी निवडून आले नाही तर हे शक्य नव्हतं”, असेही राजाभाऊ फड यांनी म्हटले.