#

Advertisement

Monday, January 13, 2025, January 13, 2025 WIB
Last Updated 2025-01-13T12:18:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवारांच्या विधानामुळे शेतकरी संभ्रमात

Advertisement

कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं 
पुणे : भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असे जाहीर केलं होते. मात्र, आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पुण्यातल्या दौंडमधील एका जाहीर कार्यक्रमातल्या कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं, या  विधानामुळे कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यात जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी नाहीतर जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुखांनी दिला आहे.
एकीकडे अर्थमंत्री शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं असं म्हणत आहेत. त्याला आता त्यांच्याच मित्रपक्षाने आणि मोठ्या भावाने आव्हान दिल आहे. अंथरूण बघून पाय पसरण्याऐवजी आम्ही अंथरूनच वाढवू असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. तेव्हा भाजपनं मित्रपक्षाविरोधात थेट भूमिका घेतल्याचं दरेकरांच्या विधानावरुन दिसत आहे.