#

Advertisement

Monday, January 13, 2025, January 13, 2025 WIB
Last Updated 2025-01-13T11:56:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

जिजाऊ यांच्याप्रमाणे मुलांवर गरज संस्काराची : प्रा. लक्ष्मण ढोबळे

Advertisement

मंगळवेढा : सध्याच्या काळात जिजाऊ माँसाहेब यांच्याप्रमाणे संस्काराची मुलांवर गरज आहे. दिशाहीन झालेल्या युवकांसाठी स्वामी विवेकानंद हे प्रेरणास्थान ठरणारे आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी सांगितले. 
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मंगळवेढा शहर व तालुका यांच्या वतीने भैरवनाथ शुगर कार्यालयात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे बोलत होते. यावेळी भैरवनाथ उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिल सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष लक्ष्मण ढोबळे, मतदारसंघाध्यक्ष संतोष रंधवे, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, जमीर इनामदार, स्मिता आवघडे, बबन अजय आदाटे, संतोष नागणे, साहेबराव पवार, संतोष नागणे, नानासाहेब करपे, मायाप्पा प्रसाठे, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी अनिल सावंत म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे झालेल्या जागतिक परिषदेमध्ये माझ्या बंधू आणि भगिनींनी या शब्दातून भारतामध्ये सर्वसामान्यांबद्दल असलेली आपुलकी व्यक्त करून उपस्थितांचे मन जिंकले. तर स्वराज्य निर्मितीत करण्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवरायांसाठी प्रेरणास्थान ठरल्या. यावेळी विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या स्मिता अवघडे, सुनीता चव्हाण, संगीता राजपूत, सविता सगट, महादेवी शिंदे, नंदा ओमजे, वंदना जगताप, राधिका शिरसट, पूजा मुढे या महिलांना जिजाऊ प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन अजय आदाटे यांनी मानले.