Advertisement
ठाणे : सरकारने कारवाई केली, वाल्मिक कराड आतमध्ये आहे. सरकार कमी पडले नाही, योग्य कारवाई होत आहे. शिवसेना संपली आहे, त्यांचे आमदार, खासदार कोकणात नाहीत. संजय राऊतांबद्दल विचारताच ते म्हणाले की, माझा दिवस चांगला गेला, कशाला त्याचं नाव काढता. आज एक बोलतो, उद्या सरेंडर होतो. त्यांची वैचारिकता संपली आहे. खच्चीकरण झालं आहे, नैराश्यात गेले आहेत, असं नारायण राणे म्हणाले.
ठाण्यातील शिवाईनगर येथे आयोजित कोकण ग्रामविकास मंडळ 26 व्या मालवण महोत्सवात खासदार नारायण राणे बोलत होते. 35 वर्षांपूर्वी कोकणात खूप समस्या होत्या. पाणी, आरोग्यासारखे प्रश्न होते. महाराष्ट्र विधानसभेच्या 11व्या मूळ वाचनालयात कोकणावरची पुस्तक घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सिंधुदुर्गात पाण्याचा टँकर लागत नाही. बारा महिने पाणी मिळेल अशी व्यवस्था आहे. जी धरणं पाहिजेत ती त्या वेळेला पूर्ण केली. आता काही धरणांचे काम सुरू आहे. शिक्षणासह काहीच त्या ठिकाणी आम्ही बाकी ठेवलं नाही. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 400 पेक्षा जास्त शिक्षक जागा मंजूर करून घेतल्या. वर्ग शिक्षक नाही अशी तक्रार कोणी करू शकत नाही. मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं आहे, असं नारायण राणे म्हणाले.
