Advertisement
दिल्ली : विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचाराकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेवादीर अर्ज 17 जानेवारीपासून भरण्यास सुरुवात होणार आहे. तर 20 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. आज राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये 20 नावांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, ब्रीज मोहन श्रीवास्तव, सुबोध मोहिते, अविनाश अदिक, संजय प्रजापती, उमाशंकर यादव, धीरज शर्मा, चैतन्य मानकर, विरेंद्र सिंग, दिपाली अरोरा यांच्यासह आणखी काही नेत्यांचा समावेश आहे.
