#

Advertisement

Tuesday, January 14, 2025, January 14, 2025 WIB
Last Updated 2025-01-14T12:09:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन

Advertisement

सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचे निधन झाले. सोलापूर महापालिकेमध्ये त्यांनी महापौर पद भूषवले. महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते. महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे अचानक निधन झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे. 
प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी महेश कोठे गेले होते, नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडीमुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.  त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे हे महापालिकेचे नगरसेवक राहिले आहेत तसेच, पुतणे देवेंद्र कोठे हे भारतीय जनता पार्टी कडून शहरमध्येचे आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मधून महेश कोठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवली होती परंतु त्यांना अपयश आले यापूर्वीही त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. आमदार होण्याचे स्वप्न तसेच त्यांनी सुरू केलेल्या आयटी पार्कचे स्वप्न अधुरेच राहिले असे म्हणावे लागेल.